वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्यास केले जेरबंद
दिनांक १७/०७/२०२३ रोजी माळवाडी पोलीस स्टेशन हद्दित कोम्बींग ऑपरेशन चालू असताना वारजे पोलीस चौकीचे बिटमार्शल पोलीस अंमलदार तांगडे व काटे हे गस्त घालत असताना पोलीस कंट्रोल रुमवरुन कॉल प्राप्त झाला की संघर्ष चौकात एक इसम रिव्हॉल्वर घेवून थांबलेला आहे..
सदरचा कॉल प्राप्त होताच बिटमार्शल वरील अंमलदार यांनी सदरबाबत वरिष्ठांना कळविले यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जैतापुरकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल सावंत, पोलीस अंमलदार राहुल कदम, बालाजी काटे व निखील तांगडे यांनी सदर ठिकाणी जावून,एका इसमाला ताब्यात घेतले आहे, इसम यास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याने त्याचेकडील दुचाकी स्कुटीचे डिक्कीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल लपवलेले मिळुन आले. त्यास देशी बनावटीचे पिस्टलसह ताब्यात घेवून त्याचे विरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे....
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे हे करत आहेत. वारजे माळवाडी पोलीसांनी त्यास विनापरवाना पिस्टल बाळगले असताना पकडून एका गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडण्यापासून प्रतिबंध केला आहे.
सदरची कामगिरी मा अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ३. पुणे शहर श्री सुहेल शर्मा मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, श्री भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी, यांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, अमोल सावंत, पोलीस अंमलदार राहुल कदम, बालाजी काटे व निखील तांगडे यांनी केलेली आहे.
0 Comments