(PCB NEWS) दि.२६/११/२०२४ रोजी सकाळी ८:३० वा चे दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत सारसबाग या ठिकाणी पुणे शहर पोलीस दल व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २६/११/२००८ रोजी शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व शहिदांच्या स्मरनार्थ शालेय मुलांकरीता चित्रकला व खाऊ वाटपाचा कार्यक्रम सारसबाग स्वारगेट पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर वेळी २६/११ हल्यातील शहिद जवानांना मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार मा. पोलीस सह आयुक्त पुणे श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन पुणे श्री, अरविंद चावरिया, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री, प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि:-१ पुणे श्री संदिपसिंह गिल, मा. पोलीस उप आयुक्त परिः-२ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिः-५ पुणे श्री आर. राजा, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा, पुणे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, श्री राहुल आवारे, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे तसेच कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पुणे चे आमदार श्री. हंमत रासने सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक श्री दैठणकर, यांचेसह पोलीस आयुक्तलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शहिदांना मानवंदना देऊन सलामी देण्यात आली तसेच सेवा मित्र मंडळ पुणे अध्यक्ष श्री. शिरीष मोहिते, श्री. राजाभाऊ कदम व पदाधिकारी त्याचप्रमाणे पुणे शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
पुणे शहर पोलीस व सेवा मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे शहरातील शालेय विद्यार्थी यांची चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. सदरच्या चित्रकला स्पर्धेला सुमारे ६००० ते ७००० वेगवेगळ्या वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर चित्र काढण्यास सांगुन त्यांना प्रशस्तीपत्र व बक्षिस वितरण करुन खाऊ वाटप करण्यात आले आहे.
सदरचा कार्यक्रम पुणे शहर पोलीस आयुक्तालय व सेवा मित्र मंडळ यांचेवतीने आयोजित करण्यात आला होता.
0 Comments