(PCB NEWS) दिनांक २६/११/२०२४ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा. पोलीस फौजदार राजु पुणेकर, पोलीस अंमलदार सुनिल महाडीक, दत्तात्रय खरपुडे, गणेश गोसावी असे दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहरचे हडपसर, पुणे येथील कार्यालयात कर्तव्यावर हजर असताना पोलीस अंमलदार गणेश गोसावी व दत्तात्रय खरपुडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १७९९/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०९, ११५ (२), ३५२, ३५१ (२), १९१ (२), १९१ (३), १९० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३ (१) सह १३५, व आर्म अॅक्ट कलम ४ सह २५ व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कलम ३, ७ गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे सौरभ इंगळे रा. झेड कॉर्नर, शिवकृष्ण सोसायटी, मांजरी रोड, केशवनगर, पुणे हा त्याचे राहते घराचे सोसायटीचे समोर उभा असुन, त्याने हिरव्या रंगाचा शर्ट व ग्रे रंगाची जिन्स पॅन्ट घातलेले असुन, त्याने डोक्यात निळे रंगाची कानटोपी घातलेली आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळालेने मा. वरिष्ठांचे आदेशाने बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता, बातमी प्रमाणे वरील वर्णनाचा पाहीजे आरोपी हा शिवकृष्ण सोसायटी चे समोर उभा असलेला मिळुन आल्याने त्यास वरील स्टाफचे मदतीने ताब्यात घेतले. त्यास पकडून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सौरभ आण्णा इंगळे, वय २३ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०२, तिसरा मजला, शिवकृष्ण सोसायटी, झेड कॉर्नर, मांजरी रोड, केशवनगर, पुणे असे असलेचे सांगितले.
सदर आरोपी हा हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. १७९९/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१ (२), १९१ (२), १९१ (३), १९० सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३ (१) सह १३५, व आर्म अॅक्ट कलम ४ सह २५ व क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कलम ३,७ या गुन्ह्यातील पाहीजे आरोपी असलेने त्यास पुढील कार्यवाही करीता हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे- २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, पोलीस अंमलदार, राजु पुणेकर, सुनिल महाडीक, गणेश गोसावी व दत्तात्रय खरपुडे यांनी केली आहे.
0 Comments