(PCB NEWS)अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिलेल्या सूचनावरून अंमली पदार्थ विरोधी पथक हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना बातमी मिळाली की एकता मित्र मंडळ चौक, कात्रज पुणे येथे एक इसम हा 
गांजा घेऊन येणार आहे, मिळालेल्या माहितीनुसार 
अंमली पदार्थ विरोधी पथक २, यांनी त्या ठिकाणी जाऊन इसम नामे, देव नरेश तनेजा, वय २४ वर्षे, याच्या ताब्यातुन एकुण २ लाख ,४३ हजार रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ व इतर पैवज जप्त करून, त्याचे विरुध्द भारती विदयापिठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की 
दि.२६/११/२०२४ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड तसेच अधिनस्त अधिकारी व अंमलदार असे पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शेळके यांना मिळालेले बातमीनुसार एकता मित्र मंडळ चौक, कात्रज पुणे येथे सार्वजनिक ठिकाणी इसम नामे देव नरेश तनेजा, वय २४ वर्षे, याच्या ताब्यातुन एकुण २,४३,०००/- रु.कि.चा गांजा हा अंमली पदार्थ व इतर पैवज जप्त करून त्याचे विरुध्द भारती विदयापिठ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१०००/२०२४, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि नितीनकुमार नाईक, अं.प.वि.प.२, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार संदिप शेळके, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, नितीन जगदाळे युवराज कांबळे, संदिप जाधव, उदय राक्षे, दिशा खेवलकर, साहिल शेख, अझिम शेख, आझाद पाटील, निलम पाटील यांनी केली आहे.