पुणे शहर वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडुन पुणे शहरातील महत्वाचे रस्त्यांवरील एकुण २७ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.पुण्यात यंदा होळी आणि धुलिवंदन हा सण मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र या सणाला गालबोट लागू नये म्हणून पुणे पोलीसांनी कंबर कसली होती. पुणे पोलिसांकडून पुणे शहरामध्ये २७ ठिकाणी नाकाबंदीचे करण्यात आले होते.
पुण्यात वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालू नये असे देखील आवाहन केले होते.

मात्र , तरीदेखील मद्यपान करून वाहन चालवताना वाहन चालक आढळून आले. पुणे वाहतूक पोलिसांनी सोमवारी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत १४२ दुचाकी वाहन चालक तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई केली.
२२६ वाहनचालकांना ट्रिपल सिट वाहन चालवत असलेबाबत दंड आकारण्यात आला .
तसेच राँग साईडने वाहन चालवणे, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे, कर्कश आवाजाचे सायलन्सर वापरणे, सिग्नल तोडणे  अशा ९३३ कायदेशिर कारवाया करुन दंड आकारण्यात आला आहे.

काल दिनांक २५/०३/२०२४ रोजी संपुर्ण होळी व धुलीवंदन हा सण पुणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या उत्सवाचे अनुषंगाने पुणे शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. होळी धुलीवंदन सणाचे अनुषंगाने वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर कायदेशिर कारवाई करण्यासाठी मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. प्रविण पवार, सह पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर व श्री. रोहिदास पवार पोलीस उप आयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक पोलीस व स्थानिक पोलीस स्टेशन यांचेकडुन पुणे शहरातील महत्वाचे रस्त्यांवरील एकुण २७ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते.

नाकाबंदी दरम्याने एकुण १४२ इसमांवर मद्यसेवन करुन वाहन चालवत असले बाबतची "ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची" कारवाई करण्यात आली तसेच २२६ वाहनचालकांना ट्रिपल सिट वाहन चालवत असलेबाबत दंड आकारण्यात आला तसेच राँग साईडने वाहन चालवणे, वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलणे, कर्कश आवाजाचे मॉडीफाईड सायलन्सर वापरणे, सिग्नल तोडणे अशा प्रकारच्या इतर ९३३ कायदेशिर कारवाया करुन दंड आकारण्यात आला आहे. आगामी काळात देखील अशा प्रकारच्या कारवाया वाहतूक शाखेकडुन करण्यात येणार आहेत.