गुन्हे शाखा युनिट ५, यांना माहिती मिळाली एक इसम चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी कोंढवा शितल पेट्रोल पंपाजवळ, कोंढवा येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली होती गुन्हे शाखा युनिट पाच कडील अधिकारी हे सदर ठिकाणी पोचून तेथून आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असून त्याच्याकडून ५५ हजार रुपये किमतीच्या ५ मोबाईल जप्त करण्यात आल्या आहे सदर आरोपीने, हे मोबाईल कोंढवा हडपसर भाजी मार्केट या ठिकाणाहून चोरल्याचे कबूल केले आहे.


दि. २३/०३/२०२४ रोजी युनिट ५. गुन्हे शाखा, पुणे शहर कडील अधिकारी व अंमलदार हे युनिट कार्यक्षेत्रात कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना पोलीस पथकाला माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे परवेझ शेख याने कोंढवा व हडपसर येथील बसमधुन आणि भाजी मार्केट येथुन मोबाईल चोरी केलेले असुन चोरी केलेले मोबाईल विक्री करणेकामी शितल पेट्रोल पंपाजवळ, कोंढवा येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. युनिट कडील स्टाफने वरिष्ठांच्या आदेशाने शितल पेट्रोलपंपाजवळ सापळा रचुन बातमीतील वर्णनाप्रमाणे इसमास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले, त्याचे नाव परवेझ रहमान शेख, वय- ४० वर्षे, रा. भाग्योदय नगर, कोंढवा खुर्द, पुणे यास त्याचे कब्जातील एकुण ५५,०००/- रु.कि.चे एकुण ५ मोबाईल हॅन्डसेटसह ताब्यात घेतले. त्याबाबत त्याचेकडे केलेल्या तपासात त्याने कोंढवा येथील एका घराचा दरवाजा उघडा असताना व हडपसर येथे बसमध्ये व भाजी मार्केटमधील नागरिकांच्या हातातील मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न होऊन त्यांचेकडून ५ गुन्हे उघडकीस आलेले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, पोउनि अविनाश लोहटे व पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, स्वाती गावडे, पल्लवी मोरे व राहुल ढमढेरे यांनी केलेली आहे.