गुन्हे शाखा, युनिट ३, पुणे कडील सहा. पोलीस फौजदार सुनिल पवार व सहा. पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर यांना मिळाले बातमी वरून सराईत गुन्हेगार नामे रोहन ऊर्फ दुध्या सुभाष चव्हाण, वय ३७ वर्षे, रा. दारूवाला पुल, सोमवार पेठ पुणे यास दिनांक २०/०५/२०२४ रोजी स्व. राजामंत्री पथ डीपी रोड येथील टू व्हॉल्यू व बोगन व्हिला फार्म यांचे मधील मोकळ्या मैदानातील चिंचेच्या झाडाखाली पुणे येथे पकडून त्याचेकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल, चार राऊंड व एक मोपेड गाडी असा एकुण १,२२,०००/- रू किं.चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
त्याचेकडे केले तपासात त्याने सदरचे अग्निशस्त्र हे त्याचा ओळखीचा इसम रा. मध्यप्रदेश येथून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच नमुद आरोपी हा भारती विदयापीठ पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ६९९/२०२३ भादंविक ४५४,३८०,४११ या गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी आहे.
नमुद आरोपी हा पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याचेविरूध्द जबरी चोरी, घरफोडी, अग्निशस्त्र बाळगल्याबाबत आर्म अॅक्ट सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपी विरूध्द अलंकार पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ९०/२०२४ आर्म अॅक्ट ३.२५ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. श्रीहरी बहिरट पोलीस अंमलदार सुनिल पवार, संतोष क्षिरसागर, शरद वाकसे, पांडूरंग कामतकर, किरण पवार, संजिव कळंबे, सुजीत पवार, राकेश टेकावडे, सतीश कत्राळे, सोनम नेवसे, कानिफनाथ कारखेले, गणेश शिंदे यांचे पथकाने केली आहे.
0 Comments