पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर व डेक्कन पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या वेगवेगळ्या गुन्हयांमधील जप्त करण्यात आलेला मौल्यवान व किंमती मुद्देमाल, रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन, दुचाकी-तीनचाकी वाहने असा एकुण २,३१,५४,४८९/- रूपयांचा मुद्देमाल गुन्हयातील फिर्यादी यांना परत करणेकरिता मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. न्यायालयातुन मुद्देमाल परत करणेबाबत आदेश प्राप्त करून घेवून सदरचा मुद्देमाल हा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम आज दि. ०१.०४.२०२४ रोजी दुपारी १२ वा. कॉप्स एक्सलन्स हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आलेला होता.

सदर कार्यक्रमाकरीता मा.प्रविण पवार पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे हस्ते समर्थ पोलीस ठाणेकडील २ गुन्हयातील ३.९४,५००/- रूपयांचे मौल्यवान दागिने व रोख रक्कम, खडक पोलीस ठाणेकडील २ गुन्हयातील २,७९,३५०/- रू. मौल्यवान दागिने व ३७ लॅपटॉप, फरासखाना पोलीस ठाणेकडील ७ गुन्हयातील २,१४.९४.६३९/- रूपयांचे मौल्यवान दागिने, दुचाकी-तीनचाकी वाहने, मोबाईल फोन, शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील ७ गुन्हयातील ८.२२,०००/- रू. सोन्याचे दागिने, डेक्कन पोलीस ठाणेकडील २ गुन्हयातील १,६४,०००/- रू. सोन्याचे दागिने असा एकुण २.३१,५४,४८९/- रू. किंमती व मौल्यवान मुद्देमाल हा गुन्हयातील फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे.

खडक, समर्थ, फरासखाना, शिवाजीनगर व डेक्कन पोलीस ठाणे पुणे शहर या पोलीस ठाणेकडील दाखल गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करणारे पोउपनि पाटील, पोउपनि रणदिवे समर्थ पोलीस ठाणे पुणे शहर, खडक पोलीस ठाणेकडील पोउपनि डोंगळे, फरासखाना पोलीस ठाणेकडील सपोनि गायकवाड, पोउपनि मोकाशी, पोउपनि काळे, पोहवा ९३४ लोंढे, पोलीस अंमलदार ८३३६ मुलाणी, पोहवा ३५२१ खाडे, शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील पोशि झांबरे व गुन्हे शाखेकडील सपोफौ मखरे, डेक्कन पोलीस ठाणेकडील पोउपनि सावंत यांचा उपस्थित मान्यवरांचे हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करून नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी भविष्यात देखील करण्याकरीता प्रोत्साहन देवून शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रम हा मा.अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला असून सदर कार्यक्रमाकरीता मान्यवर म्हणुन मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. प्रविण पवार, मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे शहर, श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे शहर, श्रीमती रूक्मिणी गलंडे मा. सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर श्री. साईनाथ ठोंबरे वपोनि प्रशांत भस्मे फरासखाना पोस्टे, वपोनि रविंद्र गायकवाड खडक पोस्टे, वपोनि मारुती पाटील समर्थ पोस्टे, वपोनि चंद्रशेखर सावंत शिवाजीनगर पोस्टे, वपोनि विपीन हसबनीस डेक्कन पोलीस ठाणे पुणे शहर हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सुत्रसंचालन मपोउपनि पंधरकर विश्रामबाग पोस्टे पुणे यांनी करून कार्यक्रमाचा समारोप श्री. साईनाथ ठोंबरे सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग पुणे शहर यांनी केलेला आहे.