सन २०२३ मध्ये समर्थ पोलीस स्टेशन कडून चार सराईत गुन्हेगारावर तडीपारी व दोन एम. पी.डी.ए. कायदया अंतर्गत मोठी कारवाई केल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा पोलीसांवरील विश्वास वाढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.

समर्थ पोलीस स्टेशन कडील सराईत गुन्हेगार नामे फिरोज ऊर्फ बबाली मकबुल खान, वय ५० वर्ष, राह आपना मस्जिद समोर, ए.डी. कॅम्प चौक, १९४०, भवानी पेठ, पुणे यास एम.पी.डी.ए कायद्यातंर्गत एक वर्षाकरीता स्थानबध्द केले बाबत...

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता व नजिकचं काळामध्ये येणारे सण निर्विघ्न व शांततेत पार पाडणे कामी मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले आहेत.

त्याप्रमाणे समर्थ पोलीस स्टेशन कडील गुन्हे अभिलेखावरील सराईत व अटटूल गुन्हेगार नाम फिरोज ऊर्फ बबली मकबुल खान, वय ५० वर्षे, राह-आयना मस्जिद समोर, ए.डी. कॅम्प चौक, ११४०, भवानी पेठ, पुणे याचे विरुध्द समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर व पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील इतर पोलीस स्टेशन येथे एकुण ६२ गुन्हे दाखल असून सन २०१८ पासून समर्थ, खडक व कोंढवा पोलीस स्टेशन येथे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, तडीपार कालावधीमध्ये गंभीर दुखापत करणे, सरकारी कामात अडथळा करणे, जबरी चोरी यासारखे एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. स्थानबद्ध इसमाचे वाढते गुन्हेगारी कारवाईना आळा घालणे साठी सन २०२० व २०२२ मध्ये एम. पी. डी. ए. अंतर्गत स्थानबद्ध व सन २०२२ मध्ये त्यास ०२ वर्षा करिता तडीपार केले असतानाही स्थानबध्द इसमाच्या गुन्हेगारी वर्तनात काही एक सुधारणा झालेली नव्हती.

नमुद सराईत गुंड व स्थानबध्द इसम नामे फिरोज ऊर्फ बबाली मकबुल खान, वय ५० वर्षे, राह-आयना मस्जिद समोर, ए.डी. कॅम्प चौक, १९४०, भवानी पेठ, पुणे याचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला नव्हता. तो अत्यंत क्रूर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढून मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरीकांना विनाकारण त्रास देवुन आपला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. तसेच बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगून लोकामध्ये दहशत निर्माण केली होती. त्याचे दहशतीमुळे व भितीपोटी त्याचेविरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे मनात भिती निर्माण होवुन त्यांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. म्हणून श्री. सुरेश शिंदे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबध्द करणे बाबत चा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांना सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी दिनांक ०३/०८/२०२३ रोजी अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे स्थानबध्द करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे समर्थ पोलीस स्टेशन कडून त्यास स्थानबध्द करण्यात आले आहे.

सन २०२३ मध्ये समर्थ पोलीस स्टेशन कडून चार सराईत गुन्हेगारावर तडीपारी व दोन एम. पी.डी.ए. कायदया अंतर्गत मोठी कारवाई केल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचा पोलीसांवरील विश्वास वाढला आहे.

सराईत गुन्हेगारा कडून अशा प्रकारे आगामी पुणे मनपा निवडणूक, सण व उत्सव काळात कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अटट्ल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.

सदर कारवाई श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. संदिपसिंह गिल, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१ पुणे शहर, श्री. अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शना खाली श्री. सुरेश शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सुनिल रणदिवे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार संतोष थोरात व पोलीस अमलदार किरण शितोळे यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेवून प्रस्ताव तयार केलेला आहे.